आता तुमचे राशन धान्य होणार बंद ration card new update
मित्रांनो जर तुमच्याकडे कार,ट्रॅक्टर,दुचाकी घरामध्ये असेल तर तुम्हाला मिळणारे रेशन कार्ड वरील धान्य आता बंद होणार आहे. जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला रेशनवर मिळणारे स्वस्त धान्य खूप मोठ्या प्रमाणात आणि मुबलक उपलब्ध व्हावे याकरिता जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने विशेष अभियान राबवल्या जात आहे.
तसेच जिल्ह्यातील मोफत धान्याचा लाभ घेत असलेले नागरिक स्वखुशीने हे धान्य सोडायला पाहिजे. याकरिता जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आवाहन केले आहे.ration card new update
या योजनेतून जेही काही लाभार्थी स्वस्त धान्याचा लाभ घेत आहेत. परंतु ते सदन आहेत अशा लोकांनी हे स्वस्त धान्य न घेतल्यास इतर काही गरीब व गरजू लोकांना याचा लाभ जास्त प्रमाणात देता येईल. त्यामुळे अशा लाभार्थ्यांनी स्वखुशीने आपण घेतलेले जे स्वस्त धान्य आहे ते सोडण्यास सुरुवात झाली आहे.
स्वस्त धान्य पुरविण्यात येत असलेल्या या अन्नसुरक्षा योजनेतून बाहेर पडण्यास अनेक लाभार्थ्यांनी सुरुवात सुद्धा केलेली आहे. यासाठी पोर्टलवर अर्ज सुद्धा करण्यास व ऑफलाईन पद्धतीने सुद्धा फॉर्म भरून सुरुवात केलेली आहे.
रेशन कार्ड वर लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांकडे जर कार किंवा ट्रॅक्टर असेल तर त्यांची आता चौकशी केली जाणार आहे.
तुमच्याकडे जर ट्रॅक्टर किंवा दुचाकी चार चाकी असेल तर ती माहिती तुम्हाला द्यायची आहे तसेच तुमच्याकडे पक्के घर किंवा शेती आहे किंवा नाही हे सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे अशा प्रकारची सर्व माहिती तुमच्याकडून संकलित केली जाणार आहे यामध्ये जर तुमच्याकडे शेती आढळून आल्यास किंवा पक्के घर बागायती शेती ट्रॅक्टर दुचाकी चार चाकी अशा प्रकारच्या वस्तू असतील तर तुमचे धान्य हे रद्द करण्यात येणार आहे.
ज्या लाभार्थ्यांकडे अशा प्रकारच्या सर्व वस्तू किंवा शेती आढळून आल्यास स्वतःहून या योजनेचा लाभ घेणे सोडणार नाहीत अशा लोकांची आता कसून चौकशी होणार आहे अशा लोकांच्या घरी स्वतः अधिकारी जाऊन त्यांचे धान्य सुद्धा रद्द करण्यात येणार आहेत. किंवा जिल्हा भरती शासकीय नोकरी करत असतील किंवा मोठे पगार घेणारे असतील हे सुद्धा शासनाच्या निदर्शनास आल्यास तुमचे धान्य रद्द करणार आहेत. त्याचप्रमाणे इतर नागरिकांनीही अशा काही गोष्टी तुमच्या निदर्शनास आल्यास सदन लोकांची त्यांनी सुद्धा माहिती द्यावी अशा लोकांची नावे गुप्त ठेवण्यात येत आहेत.
रेशन धान्य हक्क सोडण्यासंबंधीचे सर्व काही अर्ज कागदपत्र तुमच्या गावातील स्वस्त धान्य पुरविणाऱ्ऱ्या रेशन दुकानदार यांच्याकडे जमा करण्यात आलेले आहेत.