यावर्षीच्या हंगामामध्ये सोयाबीनची स्थिती काय राहणार?
जगामध्ये 2021 22 च्या हंगामात महत्त्वाचे सोयाबीन पीक उत्पादक देशाचे उत्पादन घटलेले होते ब्राझील आणि अर्जेंटिनात दुष्काळाचा फटका बसला तर अमेरिकेतील उत्पादन उद्दिष्टांच्या तुलनेत कमी राहील असा अंदाज मात्र 2022 - 23 च्या हंगामात जागतिक उत्पादन 11 टक्के वाढ होईल असा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागाने व्यक्त केलेला आहे मग आपल्या भारतात सोयाबीन बाजाराची स्थिती कशाप्रकारे राहणार आहे आणि वापर कसा राहील याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
युएसडीएनं जगामधील सोयाबीन उत्पादनाचा वाढ अंदाज व्यक्त केलाय. जगामध्ये सोयाबीन उत्पादन दहा टक्क्यांनी वाढेल आणि तसेच जगातील गाळपही अधिक राहण्याची शक्यता वाटत आहे. या चालू वर्षामध्ये ब्राझील मधील उत्पादन 18 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज दिसत आहे. तर अमेरिकेमध्ये दीड टक्क्यांनी वाढ अपेक्षित दिसत आहे. अमेरिकेमध्ये यंदा काही भागात दुष्काळी परिस्थितीचा चांगलाच फटका बसलेला दिसतोय. तसेच अर्जेंटिनातत 6 टक्क्यांनी उत्पादन वाढेल असाही अंदाज यूएसडीन म्हटलं आहे.
युएसडीएने यावर्षी भारतामध्ये 115 लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केलेला आहे याचा अर्थ असा की म्हणजेच की मागील वर्षाच्या तुलनेत देशात यंदा सोयाबीन उत्पादन 4 लाख टणांनी कमी राहील.
भारतामध्ये यंदा उत्पादन घटणार असले तरी सोयाबीन गाळप तीन लाख टणांनी वाढण्याचा अंदाज दिसत आहे. सोयाबीन गाळप केले नंतर तेल आणि पेंड मिळत असते.
यावर्षी भारतामध्ये 80 लाख टन सोयापेंड निर्मितीची शक्यता वाटत आहे. तर मागील वर्षीच्या हंगामामध्ये 77 लाख टन सोयापेंड मिळाली होती. उत्पादन वाढण्यासह सोयाबीन वापरही वाढण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 64 लाख टन सोयाबीनचा देशात वापर झालेला होता. तो यंदाच्या वर्षामध्ये 68 लाख टनावर पोचेल असा अंदाज दिसत आहे. त्यामुळे सोयाबीनची उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेमध्ये अडीच लाख टणांनी वाढणार असल्याचे दिसत आहे. मात्र देशांमधील सोयाबीन वापरातही साडेचार लाख टनाने वाढ होईल. असे युएसडीएनं म्हटले आहे.
म्हणजेच की यंदा देशामध्ये मागील वर्षातील शिल्लक सोयाबीन दहा लाख टन राहील मात्र उत्पादनामध्ये चार लाख टनाने घटनार आहे. तर सोयाबीन गाळप वाढून सोयाबीन उत्पादन अडीच लाख टनाने अधिक राहण्याचा अंदाज आहे. सोयाबीनच्या वापरामध्येही साडेचार लाख टन आणि वाढ होणार आहे. यंदाच्या हंगामामध्ये सोयाबीनच्या मागणीला आणि पुरवठ्यामध्ये जास्त तफावत नसेल. यावर्षीच्या हंगामातही सोयाबीनला चांगली मागणी राहू शकणार असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगल्या प्रतीचा दर मिळू शकतो.
यावर्षीच्या सोयाबीन हंगामात शेतकऱ्यांना पाच ते साडेपाच हजारांच्या वर किंवा त्यादरम्यान दर मिळण्याचा
अंदाज आहे अशी शक्यता सूत्रांकडून मिळालेली आहे.
अंदाज आहे अशी शक्यता सूत्रांकडून मिळालेली आहे.