POST OFFICE SCHEME 399 | भारतीय डाक विभाग अपघात विमा योजना
आपल्याला प्रत्येकालाच आपल्या स्वतःची काळजी असते आणि त्यासोबतच आपल्या कुटुंबाची काळजी सुद्धा आपल्याला असते.
याच दृष्टिकोनातून आपण अनेक वेगवेगळ्या विमा कंपन्याकडून आपली पॉलिसी खरेदी करत असतो.
Post office scheme पोस्ट खात्याने आपल्यासाठी देशातील नागरिकांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलेली असीच एक नवीन लाभदायी विमा योजना म्हणजेच की. म्हणजेच तुमचा अपघात झाला किंवा अपघाताने मृत्यू झाला यामध्ये 10 लाख रुपयांचा विमा तुम्हाला मिळणार आहे याच विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
या योजनेमध्ये आपल्याला फक्त 399 रुपये इतकी रक्कम दर वर्षाला भरायची आहे.
या योजनेमध्ये आपला जर अपघातामध्ये मृत्यू झाला तर 10 लाख रुपये मिळणार आहेत.
Post office scheme याशिवाय मुलांना शिक्षणाचा खर्च दवाखाना आणि ओपीडी इत्यादींचा खर्च अशा प्रकारचे अनेक फायदे या योजनेपासून सहभागी होऊन आपणास प्राप्त करता येतात. विमा या योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ व्हावा यासाठी भारतीय डाक विभागातील कर्मचाऱ्यांकडून देखील या विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे.
या योजनेमध्ये दोन प्रकारचे प्लॅन असणार आहेत प्रति वर्ष 299 रुपये विमा आणि प्रतिवर्ष 399 रुपये विमा यासाठी वयाची अट काय असणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत.
भारतीय डाक विभागाने सुरू केलेली ही योजना आहे या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य काय आहेत?
1) आपला जर अपघातामध्ये मृत्यू झाला तर आपल्या कुटुंबाला दहा लाख रुपयांचा विमा या विमा योजनेद्वारे प्राप्त होणार आहे.
2) अपघात होऊन एखाद्या व्यक्तीला कायमचे अपंगत्व आले तरी देखील अशा लोकांना दहा लाख रुपये विम्याचा लाभ या योजनेअंतर्गत मिळणार आहे.
3) या योजनेमध्ये एक्सीडेंट झाल्यानंतर दवाखान्याचा खर्च देखील दिला जाणार आहे यामध्ये 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च दवाखान्यामध्ये दाखल न होता तरीदेखील 30 हजार रुपयांपर्यंत तुम्ही क्लेम करू शकता.
4) मुलांच्या शिक्षणासाठी देखील या योजनेमध्ये तुम्हाला खर्च दिला जाणार आहे उदा. आपल्या कुटुंबामध्ये दोन मुले जर असतील तर या दोन मुलांना प्रति वर्ष एक लाख रुपये इतका खर्च दिला जाणार आहे.
5) जर तुम्ही आजारपणामध्ये तुमची प्रकृती खूप जास्त खराब असल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले असाल तरीसुद्धा दहा दिवस लागणारा खर्च हजार रुपये प्रति दिवसाप्रमाणे पूर्ण खर्च दिला जाईल.
आणि तुम्ही दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी ऍडमिट झालेले असाल अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कुठलाही खर्च मिळणार नाही.
6) या योजनेअंतर्गत आपल्याला तीस हजार रुपये पर्यंतचा ओपीडी खर्च सुद्धा दिला जातो.
7) एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास अपघातामध्ये जर प्यारेलाइज झालेला असल्यास या ठिकाणी दहा लाख रुपयांचा विमा अशा व्यक्तींना मिळणार आहे.
8) दवाखान्याचा खर्च व प्रवास खर्च सुद्धा आपल्या सर्व कुटुंबाला मिळून 25 हजार रुपये दिला जातो.
9) विमा काढलेल्या व्यक्तीचा जर अपघातामध्ये मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी पाच हजार रुपये दिले जातात.
या विमा योजनेची गुंतवणूक किती वर्षापर्यंत आपण करू शकतो यासाठी वयाची काय अट आहे?
या योजनेअंतर्गत आपण जी गुंतवणूक आहे ती 18 ते 65 या वयापर्यंत करू शकतो या वयातील नागरिक या Post office schemeयोजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आपले चालू खाते असणे आवश्यक आहे आणि आपल्याकडे जर इंडियन पोस्ट बँकेचे खाते नसेल तर यामध्ये आपण नवीन खाते उघडू शकता.
299 च्या या योजनेत नागरिकांना कोणता लाभ प्राप्त होणार नाही?
399 ऐवजी जर तुम्ही 299 र रुपयांच्या योजनेत सहभागी झालास. तर तुम्हाला पुढील प्रमाणे लाभ होणार नाही.
मुलांचे शिक्षणासाठी केला जाणारा जो एक लाख प्रति वर्ष खर्च आहे तो तुम्हाला मिळणार नाही.
दवाखान्यात असताना दिला जाणारा जो प्रति दिवस एक हजार रुपये जो खर्च आहे तो मिळणार नाही.
कुटुंबाला मिळणारा दवाखान्याचा वाहतूक प्रवास खर्च अशा व्यक्तींना दिला जाणार नाही.
विनाधारकाचा जो अंत्यसंस्काराचा जो पाच हजार रुपये खर्च आहे तो सुद्धा मिळणार नाही.
भारतीय डाक विभागाने ही योजना कशासाठी सुरू केली व का सुरू केली आहे?
विमाधारक व्यक्तीला दहा लाख रुपये पर्यंतचे कव्हर करून देण्यासाठी अशा प्रकारची ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
ग्रामीण भागातील गोरगरीब व तसेच शहरी भागातील अशा लोकांना या विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार नाही?
पोलीस दलातील तसेच नौदल हवाई अशा व्यक्तींना या विमा योजनेचा लाभ घेता येणार नाही.
या योजनेचा कालावधी किती असणार?
Post office schemeया विमा योजनेचा एकूण कालावधी हा 1 वर्ष असणार आहे एक वर्षानंतर विमाधारकास आपल्या विमा खात्याचे नूतनीकरण पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन करायचे आहे.
या योजनेमध्ये टाटा ईआयपी आणि इंडियन पोस्ट बँक या दोन्ही कंपन्यांचा करार करून ही योजना सुरू करण्यात
आलेली आहे.
आलेली आहे.