ऑक्टोंबर महिन्यात संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन पर अनुदान 50 हजार रुपये जमा.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमार्फत कर्जमुक्ती केली अशावेळी ज्या काही शेतकऱ्यांनी नियमित कर्ज परतफेड केलेली आहे अशा शेतकरी बांधवांना प्रोत्साहन पर अनुदान म्हणून 50 हजार रुपये रक्कम देण्याची देखील जाहीर केलेले आहे मात्र सरकार बदलल्यानंतर पैसे मिळणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान या योजनेचा लाभ उद्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.
अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ही माहिती आपले सहकार मंत्री अतुल सावे यांच्यामार्फत देण्यात आलेले आहे. पन्नास हजार रुपये लाभ देण्यासाठी सन 2017 18 सन 2018 19 या काळामध्ये मान्यता देण्यात आली आहे.
गेले काही दोन वर्ष कोरोना महामारीमुळे आपल्या राज्य सरकारच्या महसूल महसुलामध्ये मोठा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे काही कारणास्तव राज्य सरकारने या दोन वर्षांमध्ये दीड लाख कोटी अधिकचे कर्ज काढलेले आहे. याच कारणामुळे प्रोत्साहन पर लाभ 50 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळण्यासाठी विलंब करावा लागत आहे.
आतापर्यंत 7.15 लाख पात्र खातेदार शेतकऱ्यांची आधार पडताळणी झालेली आहे. कोरोना काळामध्ये जशाप्रमाणे राज्य सरकारवर खूप काही अशी कर्ज झाले होते त्याचप्रमाणे आपला शेतकरी देखील मागील दोन वर्षात कर्जा खाली दबला आहे. म्हणून सर्व काही शेतकरी बांधवांची अशीच विनंती होती की लवकरात लवकर या निर्णयाची अंमलबजावणी करा असा देखील आग्रह शेतकऱ्याकडून धरला जात होता. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने हालचाली सुरू केलेले आहेत.
आता जी रक्कम शेतकऱ्यांनी काढलेली होती ती कर्जाची रक्कम वेळेवर नियमितपणे परतफेड केलेली आहे अशे काही शेतकरी या योजनेमध्ये निवडक पात्र शेतकरी म्हणून शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सावे यांनी दिलेली आहे. ही प्रोत्साहन पर अनुदान रक्कम तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार म्हणून शेतकऱ्यांना खूप असा मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
आता प्रोत्साहन पर अनुदान 50 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून म्हणजेच की ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आत्तापर्यंत 7.15 लाख पात्र खातेदारांचे आधार सुद्धा या ठिकाणी पडताळणी पूर्ण झालेली आहे या पडताळणीचे पूर्ण काम झाल्यानंतर सर्व काही जे पात्र लाभार्थी या पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदानासाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना उद्यापासून त्यांच्या खात्यामध्ये 50 हजार रुपये रक्कम जमा केली जाणार आहे.