शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या बँकेत खाते असेल तर मिळणार 50 हजार रुपये

     शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या बँकेत खाते असेल तर मिळणार 50 हजार रुपये



शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या बँकेत खाते असेल तर मिळणार 50 हजार रुपये


 केंद्राकडून आणि राज्याकडून शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रासाठी विविध प्रकारच्या लाभदायक आणि फायदादायक योजना राबविल्या जातात. जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करत असताना येणाऱ्या काही अडचणी कमी व्हाव्या आणि शेतकऱ्यांना जास्तीच्या आर्थिक उत्पादन मिळण्यासाठी हा त्यामागचा एक उद्देश असा म्हटले जाईल. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या बँकांकडून सुद्धा शेतकऱ्यांसाठी खूप प्रकारच्या अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात

अशीच  महत्त्वाची योजना पंजाब नॅशनल बँकेची योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरू शकते. याबद्दल या लेखामध्ये माहिती घेऊया तरी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा


पंजाब नॅशनल बँक योजना.

पंजाब नॅशनल बँकेने आपले अधिकृत ट्विट करत सांगितले आहे की शेती क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने शेतकऱ्यांसाठी किसान तात्काळ कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये जास्तीत जास्त 50000 कुठल्याही प्रकारची हमी न देता व कमीत कमी कागदपत्रे देऊन या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. पंजाब नॅशनल बँकेने असे म्हटले आहे की हे तुम्ही 50 हजार रुपये कर्ज बँकेकडून घेणार आहात ते कर्ज शेतीसाठी किंवा तुम्हाला घरगुती गरजांसाठी जी काही पैशाची गरज भासत असते तुम्ही हे कर्ज घेऊन आपल्या गरजा भागू शकता.

 या बँकेकडून किसान तात्काळ कर्ज योजनेची सुविधा ग्राहकांना सध्या पुरविल्या जात आहे या योजनेअंतर्गत जेही 50 हजार रुपये कर्ज आहे ते शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा केले जाईल. पंजाब नॅशनल बँकेने असे सुद्धा म्हटले आहे की तुम्ही या पैशाचा लाभ घरगुती गरजांसाठी सुद्धा करू शकता.


योजनेचा फायदा कोणाला मिळणार आहे.

जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही कृषी क्षेत्रात काम करणारे शेतकरी किंवा शेतजमीन भाडेतत्त्वावर घेतलेली आवश्यक आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या म्हणण्यानुसार फक्त शेतकरी किंवा शेतकरी गट ज्या शेतकऱ्यांकडे अगोदरच किसान क्रेडिट कार्ड आहे अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल.

याकरिता शेतकऱ्यांकडे मागील दोन वर्षाचे अचूक बँक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे. याबाबत पंजाब नॅशनल बँकेच्या अधिसूचनेचा विचार केला तर शेतकऱ्यांना 25% पर्यंत कर्ज दिले जाईल व यामध्ये पन्नास हजार रुपये कमाल मर्यादा आहे.

या योजनेची वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना यामध्ये कोणत्याही प्रकारचे गहाण खत किंवा कोणतेही प्रकारचे सेवा शुल्क शेतकऱ्यांना भरण्याची गरज नाही. या योजनेचे जेही शेतकरी कर्ज घेतील त्यांना जी परतफेड आहे ती पाच वर्षाचा कालावधी इतकी परतफेड दिलेली आहे.

कोणतेही शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेमध्ये जाऊन स्वतः अर्ज करू शकतात किंवा ऑनलाईन अर्ज देखील बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्या ठिकाणाहून सुद्धा शेतकरी अर्ज करू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.