Lumpy skin disease
शेतकऱ्यांनो लंम्पी स्कीन आजारापासून सावधान
लंम्पी स्कीन हा आजार कशामुळे होतो?
गाय आणि म्हैस वर्गात दिसणारा हा लंम्पी स्कीन आजार विषाणूजन्य आजार आहे. हा आजार विषाणू देवी गटातील या प्रवर्गातील असून शेळ्या मेंढ्यांना देखील देवी रोगाच्या विषाणूची सामर्थ्य आढळते. आपल्या देशात प्रामुख्याने गोवंशात हा आजार दिसतो. यापूर्वीच्या संशोधनात हा लंम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव देशी गाईंपेक्षा संकरित गुरांमध्ये अधिक असतो.
असे या अगोदर नमूद करण्यात आलेले आहे. मात्र लंम्पी स्कीन हा आजार आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर देशी गुरांमध्ये म्हणजेच की गाईंमध्ये दिसून येत आहे.हा आजार सर्व गाई बैल नर व मादी होत असला तरी लहान वासरात जास्त प्रमाणावर होत आहे.
शेळ्यांना किंवा मेंढ्यांना हा लंम्पी स्किन आजार होतो का?
शेळी किंवा मेंढी देवी आजाराच्या विषाणूशी साम्य आढळत असेल तरी हा आजार त्यांना अजिबात होत नाही.
लंपी स्किन चा प्रसार
कसा होतो?
या रोगाचा प्रसार चावणाऱ्या माशा गोचीड या कीटकांमुळे होतो. खूप जास्त दिवसांपासून निरोगी असलेले जनावरे व त्यांच्या नाकातील श्रावणे दूषित झालेला चारा आणि पाण्याद्वारे प्रसार होऊ शकतो.
छाती पोळी आणि पायावर सूज येऊन जनावर लंगडते सतत ताप येतो श्वासास त्रास होणे नाकातून स्त्राव येतो डोळ्यातील वरणामुळे चिपडे येऊन दृष्टी बाधित होते तोंडात व्रन निर्माण होऊन गुरांना चारा खाण्यासाठी त्रास होऊ लागतो
मागील दोन वर्षांमध्ये मृत्युदर वाढण्याचे कारण काय?
मागील वर्षांमध्ये लंम्पी स्कीनच्या आजारांमध्ये क्वचित शरीराच्या आतील अवयवात गाठी दिसत होत्या मात्र यावर्षीच्या लंम्पी स्कीनमध्ये श्वासनलिका अशा अनेक अवयवातही गाठी होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे धोकादायक ठरला आहे.
बाकी इतर राज्यांमध्ये गुरांमध्ये मरण पावण्याचा दर पाच टक्के असला तरी महाराष्ट्रात मात्र पशुसंवर्धन विभागाच्या नियोजनपूर्वक प्रयत्नामुळे सध्याच्या स्थितीमध्ये १.९ टक्के आहे.
अनेक वेळा निमोनिया कावीळ इत्यादी आजारांमुळे जनावरांचा मृत्यू जास्त प्रमाणात दिसून आला आहे.
लंपी स्कीन हा आजार तुम्हाला आढळल्यास काय करावे लागणार?
तुम्हाला लंम्पी स्कीन हा आजार आढळल्यास तुम्ही लवकरात लवकर जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय संस्थाप्रमुखाशी संपर्क करावा. आणि जे जनावर आजारी आहे त्याला निरोगी जनावरांपासून ताबडतोब वेगळे करून जास्त वेळ न घालवता उपचार सुरू करावे.
लंम्पी स्कीन हा आजार जास्त पसरू नये यासाठी काय करावे लागणार?
या आजाराची साथ सुरू असताना गावांमध्ये एकमेकांच्या गोठ्यात जाऊन भेटी देणे बंद करावे.
ज्या भागात आजाराची साथ सुरू आहे त्या भागातून आपली जनावरे आणि चारा वगैरे यांची वाहतूक बंद करावी लागणार.
लंम्पी स्कीन हा आजार साथ सुरू असतांना आपले जनावरे बाजारात खरेदी विक्रीसाठी नेणे बंद करावे.
गावातील सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याच्या सोयीकरता बनवलेल्या हौद किंवा चारा एकत्रीकरणाची ठिकाण आहे त्या ठिकाणापेक्षा आपल्या जनावरांसाठी वेगळी व्यवस्था करावी.
लंम्पी स्कीन होऊन जनावराचा मृत्यू झाला असल्यास मृतदेह उघड्यावर कुठेही न टाकता खोल खड्ड्यात आठ फूट पुरावा.
लंपी स्किन या आजारापासून मनुष्य वर्गाला भीती आहे का?
Lumpy skin disease गेल्या 93 वर्षाच्या इतिहासात हा आजार जनावरांपासून माणसात झाल्याची कुठेही नोंद नाही. पण शेतकऱ्यांनी जनावरांचे चारापाणी किंवा शेणपाणी झाल्यानंतर आपल्या हात साबणाने स्वच्छ धुऊन सॅनिटायझरने स्वच्छ करून घ्यावेत आणि नेहमीप्रमाणे दूध सुद्धा उकळून प्यावे.
आजारी गाईची किंवा म्हशीचे दूध वासरांना पाजावे का?
आजारी पडलेल्या गाईंच्या दुधात लंम्पी स्कीनचे विषाणू असतात त्यामुळे त्यांच्या पिल्लांना प्रादुर्भाव होऊ शकतो. शक्यतो होई तोपर्यंत वासरांना दूध न पास्ता त्यावेळी दूध उकळून थंड करून पाजावे असे केल्याने लंम्पी चे विषाणू नष्ट होतात.
आजाराचा प्रसार करणाऱ्या जंतूंचे नियंत्रण कसे करावे लागणार?
गोठा आणि त्या बाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून डासांचा त्रास कमी असणे गरजेचे आहे परिसरात साठलेले जे पाणी आहे त्या पाण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
गोचीड किंवा त्यांची अंडी आणि त्यांच्या मधल्या अवस्थांचा नायनाट करण्यासाठी गोठ्यांचा खालील भाग म्हणजेच की गव्हाण भिंतीतील भाग जाळून घ्यावा.
जेणेकरून माशा किंवा टास्क होऊ नये यासाठी आपल्या गोठ्यातील शेणाची विल्हेवाट लवकरात लवकर लावावी किंवा शेण खड्ड्यामध्ये पुरून टाकावे उघड्यावरती जे शेण टाकलेले असते त्याला पॉलिथिन किंवा ताडपत्रीने व्यवस्थित रित्या झाकून घ्यावे.
गाय किंवा म्हैस यांना सूर्यप्रकाशामध्ये करण्यासाठी सकाळी दहा ते संध्याकाळी चार पर्यंत सोडू नये या वेळेमध्ये चावणाऱ्या माशांचा प्रादुर्भाव जास्त असतो.
माशा किंवा कीटकनाशक यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गाई म्हशींच्या अंगावर तसेच गोठ्यामध्ये वनस्पतीजन्य किंवा जनावरांसाठी रासायनिक गोचीड नाशकांची फवारणी आवश्यक आहे.
वनस्पतीजन्य कीटकनाशक जसे की नीम तेल दहा मिली टाकावे करंज तेल दहा मिली टाकावे आणि निलगिरीचे तेल सुद्धा दहा मिली आणि साबण चोरा दोन ग्रॅम एक लिटर पाण्यात मिसळून गाई म्हशीच्या अंगावर गोठ्यात शिंपडणे करावी.
लंम्पी स्किन या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या प्रकारची लस देण्यात यावी?
या आजाराच्या नियंत्रणासाठी भारतातील बनावटीची लंम्पी प्रो वक इंड हि लस प्रायोगिक तत्त्वावर सध्याच विकसित केली गेली आहे. येत्या काळात ही लस सार्वत्रिकपणे उपलब्ध असणार आहे.
सध्याच्या काळात बघितले तर पर्यायांमध्ये लस म्हणून गोट फॉक्स वापरण्यात आली आहे हिलाच नियंत्रणासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
साधारणपणे दोन ते तीन आठवडे रोगप्रतिकारक शक्ती तयार होते आणि ती एक वर्षापर्यंत टिकून राहते.
मागील वर्षांमध्ये ज्या गुरांना लंम्पी आजार झाला असेल तर या वर्षांमध्ये आजार परत होणार का?
शक्यतो हा आजार पुन्हा होणे कमी आहे पण जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती आणि प्रकृती जर सुदृढ असली यावर अवलंबून आहे परंतु आजार झाल्यास कमी प्रमाणात सौम्य प्रमाण राहू शकते.
गाभण गाईला लस देता येते का?
गाभण गाईला लस देता येणार.
चारा वाहून गेल्यावर लंबी आजाराचा प्रसार होऊ शकतो का?
ज्या क्षेत्रामध्ये लंम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव जास्त आहे अक्षय क्षेत्रामधून दूषित चारा वाहतूक केल्यास आजाराचा प्रसार होण्याची शक्यता आहे.
लंम्पी स्किन चा प्रादुर्भाव कोणत्या वातावरणात अधिक प्रमाणात दिसतो?
उस्मा व दमट हवामान कीटक वाढीसाठी पोषक असते त्यामुळे गेल्या तीन वर्षात पावसाळ्यामध्ये याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर दिसून आला आहे कीटक व माशांचे प्रमाण कमी झाले की हिवाळ्यात हजाराचे प्रमाण कमी होऊ लागते.